राज्यात फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार

राज्यात फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार

मुंबई: राज्यात १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याची माहित

३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती
महाराष्ट्रातील पर्यावरणीय वृत्तांकनाचा व्यापक वेध
पर्यावरणीय अनास्था

मुंबई: राज्यात १७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक-२०२२चे सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

१७ वर्षाखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक २०२२ या स्पर्धेत भारत, चीन, जपान, मोरोक्को,  नायजेरिया, टांझानिया, कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, ब्राझील, चिली, कोलंबिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन असे १६ देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण ५ सामने राज्यात होणार आहेत. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानावर हे सामने होणार आहेत.

उपांत्य आणि अंतिम सामने नवी मुंबईत होणार असल्याने देशातील अतिमहत्त्वाचे लोक हे सामने पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना महाजन यांनी यावेळी दिल्या. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्टेडियम, वाहतूक, निवास, सुशोभीकरण, अग्निशमन व्यवस्था व रस्त्याची दुरुस्ती, वैद्यकीय व्यवस्था, स्पर्धा प्रसिद्धी, विविध समित्यांचे गठन आदी विषयांचा आढावा महाजन यांनी यावेळी घेतला.

महाजन म्हणाले, स्पर्धा केवळ सहभागी खेळाडूंनाच फायद्याची नाही तर संबंधित यजमान राष्ट्रांसाठीही खूप मोलाची ठरणार आहे. या महिला विश्वचषकाने तळागाळातील अधिक तरुण मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहित करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच महिला फुटबॉलचे व्यावसायिक मूल्य वाढवले ​​आहे. नवी मुंबई व ठाणे महानगरपालिकेतील ठाणे व रायगड जिल्ह्यातील, शालेय विद्यार्थ्यांना हे सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहता येईल, असे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी आयोजन समितीला दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: