राज्याने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

राज्याने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हज

औषध साठेबाजीः गौतम गंभीरवर कारवाई होणार
तेलुगू कवी वरवरा राव यांना कोविड-१९ची लागण
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. शुक्रवारी झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी ७ पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: