बॉलीवुडमधून हजारो कोटींची वसुली – मलिक

बॉलीवुडमधून हजारो कोटींची वसुली – मलिक

सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला बोलावले, १४ महीने झाले, पण पुढे काय झाले, असं सवाल करीत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीब

है कली कली के लबपर…….
‘जय भीम’: जागर संविधानाचा
पियुष गोयल यांचा बॉलीवूड शो फसला

सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला बोलावले, १४ महीने झाले, पण पुढे काय झाले, असं सवाल करीत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर हजारो कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर चौकशी प्रकरणावरून एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडे मुंबई एनसीबीत आल्यानंतर त्यांनी १५/२०२० हा गुन्हा दाखल केला. त्यात सारा अली, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला चौकशीला बोलावले. १४ महिने झाले तरी यात आरोपपत्रही दाखल झालेले नाही. या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आले आहेत. ”

नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी वानखेडे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

मलिक म्हणाले, “संपूर्ण बॉलिवूडला या प्रकरणात बोलावण्यात आले. मात्र आजपर्यंत ना ते प्रकरण संपलं, ना आरोपपत्र दाखल झाले. असे काय आहे, की १४ महिने हे प्रकरण बंदच होत नाहीये.”

“या प्रकरणात हजारो कोटी रुपये वसुलण्यात आले. ही वसुली मालदीवला झाली आहे. आम्ही २ फोटो दाखवले, एक दुबईचा आणि एक मालदीवचा. हे म्हणतात मी कधीच दुबईला गेलो नव्हतो, पण त्यांची बहिण दुबईला गेली होती. ते स्वतः मालदीवमध्ये होते. मालदीवचा दौरा सोपा नसतो. एवढे लोक गेले तर २०-३० लाख रुपयांचा खर्च येतो. याचा तपास झाला पाहिजे. यांचा खर्च कोणत्या खात्यातून झाला हे एनसीबीच्या सतर्कता विभागानं शोधावे,” अशी मागणी मलिक यांनी केली.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. ते म्हणाले, “कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेंचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. ते मोदींच्याही पुढे गेले आहेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ २५ ते ५० लाख रुपयांचे असते.”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर बोलताना मलिक म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केले आहेत. माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र माझ्या जावयाच्या घरातून कोणतीही आपत्तीजनक वस्तू सापडलेली नाही. फडणवीस यासंदर्भात त्यांचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकतात.”

मलिक म्हणाले, “६२ वर्ष मुंबईत घालवली, कुणीतरी येऊन सांगावं की माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखाते त्यांच्याकडे होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही,” असा सवाल मलिक यांनी केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0