इस्थर ड्युफ्लो, राजन, सुब्रह्मण्यम तामिळनाडूचे अर्थसल्लागार

इस्थर ड्युफ्लो, राजन, सुब्रह्मण्यम तामिळनाडूचे अर्थसल्लागार

चेन्नईः तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी आपल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते इस्थर ड्युफ्लो, रिझर्व

अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल
नोटबंदी, जीएसटी व सरकारी आकडेवारीवर प्रश्न विचारणारे दाम्पत्य
डुफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

चेन्नईः तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी आपल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते इस्थर ड्युफ्लो, रिझर्व्ह बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन, केंद्र सरकारचे माजी अर्थसल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम, विकासवादी अर्थशास्त्रज्ञ ज्यों ड्रेंझ व माजी अर्थसचिव एस. नारायण यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेली राज्याची अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रयत्न असून येत्या जुलै महिन्यात राज्य सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती जनतेपुढे ठेवण्यासाठी श्वेत पत्रिका जाहीर करणार आहे.

मंगळवारी राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरू झाले असून राज्याची आर्थिक घडी विशद करताना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नवे सरकार राज्याची आर्थिक घडी पुनर्स्थापित करण्यासाठी वेगाने प्रयत्न करणार असून त्यासाठी अर्थतज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन केली गेली असल्याचे सांगितले.

ही सल्लागार समिती सामाजिक न्याय्य, वाढती विषमता, महागाई, आर्थिक विकास उद्योगधंद्यांचा विकास या संदर्भात सरकारला दिशादर्शन करणार आहे. या समितीच्या सल्ल्यानुसार सरकार आपली आर्थिक धोरणे अवलंबणार असल्याचे पुरोहित यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0