टोकियो पॅराऑलिम्पिकः भाविनाबेन, निषाद कुमारला रौप्य

टोकियो पॅराऑलिम्पिकः भाविनाबेन, निषाद कुमारला रौप्य

टोकियो/नवी दिल्लीः टोकियोत सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये रविवारी भारताने दोन रौप्य पदके पटकावली. सकाळी भारताची टेनिसपटू भाविनाबेन पटेलला महिला टेबल

माध्यमांनी चुकीचे वार्तांकन केल्याचा सरन्यायाधीशांचा आरोप
राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजाराची मदत
परकीय चलनाची गंगाजळी राखण्यासाठी जुने उपाय पुन्हा?

टोकियो/नवी दिल्लीः टोकियोत सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये रविवारी भारताने दोन रौप्य पदके पटकावली. सकाळी भारताची टेनिसपटू भाविनाबेन पटेलला महिला टेबल टेनिसमध्ये तर संध्याकाळी पुरुषांच्या उंच उडीत निषाद कुमारला रौप्य पदक मिळाले.

भाविनाबेन टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली तर आजपर्यंतच्या झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवणारी ती दुसरी व निषाद कुमार तिसरा खेळाडू ठरला. या आधी ५ वर्षांपूर्वी दीपा मलिक हिने रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये गोळा फेक स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते.

निषाद कुमारने २.०६ मीटर उंच उडी मारत रौप्य पदक मिळवले आणि आपला एशियाड विक्रम कायम ठेवला. निषाद कुमारबरोबर अमेरिकेच्या डलास वाइज यानेही २.०६ मी. उंच उडी मारली होती. त्यामुळे निषाद व डलास या दोघांना विभागून रौप्य पदक देण्यात आले. उंच उडीत सुवर्ण पदक अमेरिकेच्या रॉडरिक टाउनसेंडला मिळाले. त्याने २.१५ मीटर उंच उडी मारली. त्याने या कामगिरीसह जागतिक विक्रमही केला.

निषाद कुमारला गेल्या फेब्रुवारीत कोरोनाची लागण झाली होती. पण त्याने कोविडवर मात करत कसून सराव केला व देशाला यश मिळवून दिले.

३४ वर्षीय भाविनाचा अंतिम फेरीत मुकाबला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या झाऊ यिंगशी होता. तिने भाविनाला ११-७, ११-५, ११-६ असे पराभूत केले. झाऊ यिंग हिने आजपर्यंत १२ वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. तिने अत्यंत सहजपणे खेळ केला. भाविनाने झाऊला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दुसर्या सेटमध्ये तिने ५-५ अशी बरोबरीही केली होती. पण झाऊने तडाखेबाज खेळ करत सुवर्ण पदक मिळवले. झाऊने बीजिंग व लंडन पॅराऑलिम्पिकमध्येही सुवर्ण पदक मिळवले होते.

या आधी शुक्रवारी भाविनाने रिओ पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसर्या क्रमांकाची सर्बियाची बोरिस्लावा रेंकोविचचा पराभव करून आपले पदक निश्चित केले होते.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील भाविनाबेन टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानली जात नव्हती. पण जिद्द व उत्तम कामगिरी करत तिने रौप्य पदक मिळवले.

१३ वर्षांपूर्वी भाविनाबेन अहमदाबादमधील वस्त्रपूर येथे ब्लाइंड पीपल्स असोसिएशनमार्फत टेबल टेनिस या खेळाशी जोडली गेली. तिने आयटीआयमधून शिक्षण घेतले आहे. २०११मध्ये पीटीटी थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. त्यावेळी ती जगातील दुसर्या क्रमांकाची खेळाडू झाली होती. ऑक्टोबर २०१३मध्ये बीजिंग एशियाड पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0