गीतांजली श्रींच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या कादंबरीला बुकर पारितोषिक

गीतांजली श्रींच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या कादंबरीला बुकर पारितोषिक

लेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, 'टॉम्ब ऑफ सॅन्ड'ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुकर मिळवणारी ही भारतीय भाषेतील पहिली कादंबरी आहे.

कोविड काळातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीची भरपाई एक दशकानंतर
दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते
बायडन यांच्याकडे सूत्रे देण्यास ट्रम्प तयार

नवी दिल्ली/लंडन: लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘टॉम्ब ऑफ सॅंड’ (वाळूची समाधी) या हिंदी कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित झालेली ही भारतीय भाषेतील पहिली कादंबरी आहे.

चौसष्ट वर्षीय गीतांजली श्री यांनी गुरुवारी लंडनमधील एका समारंभात सांगितले, की त्यांची या क्षणासाठी तयार नव्हती आणि पुरस्काराने त्या पूर्णपणे भारावून गेलया आहेत.

गीतांजली श्री यांनी ५० हजार युरोचे पारितोषिक डेझी रॉकवेलसोबत शेअर केले. रॉकवेलने गीतांजली श्रींच्या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला आहे, ज्याचे मूळ शीर्षक ‘सँड समाधी’ आहे.

पुस्तकाच्या अनुवादक, डेझी रॉकवेल, अमेरिकेत राहणाऱ्या चित्रकार आणि लेखिका आहे. त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये अनेक साहित्यकृतींचे भाषांतर केले आहे.

‘वाळू समाधी’ ही कादंबरी उत्तर भारताच्या पार्श्‍वभूमीवर बेतलेली आहे आणि एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेची कथा आहे. बुकर पारितोषिक ज्युरीने याला “गोड गोंधळ” आणि “महान कादंबरी” म्हटले आहे.

पुरस्कार स्वीकारताना गीतांजली श्री म्हणाल्या, “बुकर पारितोषिक जिंकण्याचे स्वप्नातही वाटले नव्हते. मी हे करू शकेन असे कधीच वाटले नव्हते. हा मोठा पुरस्कार आह. मी भारावून गेले आहे. आनंदी आणि सन्मानित झाले आहे.”

त्या म्हणाल्या, ‘वाळूची समाधी” ही आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाची कथा आहे. ही अशी ऊर्जा आहे, जी शंका-कुशंकांमध्ये आशेचा किरण जागवते. बुकर पुरस्कारामुळे हे पुस्तक आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

मैनपुरी, उत्तर प्रदेश येथील रहिवासी, गीतांजली श्री या तीन कादंबऱ्या आणि अनेक कथासंग्रहांच्या लेखिका आहेत. त्यांच्या कलाकृतींचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन आणि कोरियन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘माई’, ‘हमारा शहर उस बरस’ आणि ‘तिरोहित’ ही त्यांची हिंदीतील इतर कामे आहेत.

‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ ही आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली हिंदी कादंबरी आहे. यावर गीतांजली श्री म्हणाल्या की, हिंदी भाषेतील कोणत्याही कादंबरीसाठी पहिले आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकण्याचे समाधान आहे.”

गीतांजली श्री म्हणाल्या, ‘माझ्यासाठी हे पूर्णपणे अनपेक्षित पण चांगले आहे. मी कधीही बुकरचे स्वप्न पाहिले नव्हते आणि मी हा पुरस्कार जिंकू शकेन असे कधीच वाटले नव्हते. ही एक अतिशय उच्च पातळीची ओळख आहे, जी मला मिळाल्याचे आश्चर्य वाटते. मला आनंदी, सन्मानित आणि नम्र वाटते. ‘वाळूच्या समाधी’ची निवड केल्याबद्दल मी बुकर फाउंडेशन आणि बुकर ज्युरी यांचे आभार मानते. ‘ वाळूची समाधी’ ही आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाला दिलेली श्रद्धांजली आहे. “

त्या पुढे म्हणाल्या, ‘जेंव्हापासून हे पुस्तक बुकर्सच्या लाँग लिस्टमध्ये आले आहे, तेव्हापासून पहिल्यांदाच हिंदीबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. मी माध्यम झाले,हे मला खूप आवडले, पण त्याच वेळी मला हे सांगायचे आहे की माझ्या आणि या पुस्तकामागे हिंदी आणि इतर दक्षिण आशियाई भाषांची एक अतिशय समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. या भाषांमधील उत्तम लेखकांची ओळख होऊन जागतिक साहित्य समृद्ध होईल.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0