बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण

बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षीयपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीयपदाचे उमेदवार व सध्याचे अमेरिकेच

वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर
ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान
५ राज्यात लसीकरण गती वाढवा; निवडणूक आयोगाचे निर्देश

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षीयपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीयपदाचे उमेदवार व सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर महत्त्वाच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम राहिल्यास बायडेन ही निवडणूक जिंकण्यासाठी लागणारा २७० इलेक्टोरल मतांचा आकडा सहज पार करू शकतात.

ट्रम्प यांच्यासाठीही हे राज्य महत्त्वाचे आहे. या राज्यातील २० इलेक्टोरल मतांशिवाय ट्रम्प हे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.

बायडेन गुरुवारी रात्री देशाला उद्देशून भाषणही देणार असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे.

दरम्यान गुरुवारी बायडेन यांनी जॉर्जियामध्ये ट्रम्प यांच्यावर किंचित आघाडी घेतली आहे. तर अरिझोनामध्ये माजी अंतराळवीर व डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार मार्क केली यांनी विजय मिळवला आहे. ही जागा पूर्वी रिपब्लिकन पक्षाकडे होती.

बायडेन यांनी नेवाडा या राज्यातही आघाडी घेतली आहे. या राज्यातील सुमारे २ लाख मतांची मोजणी बाकी आहे.

बायडेन यांना सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण

चार राज्यातल्या आघाड्यांमुळे बायडेन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता बळावल्याने त्यांना संरक्षण देण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यातील अधिकारी डेलवेअर येथे पोहोचले असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. बायडेन यांच्या ताफ्यातही अधिक सुरक्षा वाढवण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर बायडेन यांच्या निवासस्थान नजीकच्या भागात विमान उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: