ट्रम्पना यमुना स्वच्छ दिसावी म्हणून गंगेचे पाणी सोडणार

ट्रम्पना यमुना स्वच्छ दिसावी म्हणून गंगेचे पाणी सोडणार

नवी दिल्ली  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेस भारत चकाचक दिसावा म्हणून मोदी सरकारने सर्व प्रयत्नांची शिकस्त सुरू केली असून आग्रा भेटीत

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग
वॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत?
कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

नवी दिल्ली  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेस भारत चकाचक दिसावा म्हणून मोदी सरकारने सर्व प्रयत्नांची शिकस्त सुरू केली असून आग्रा भेटीत यमुनेचे अस्वच्छ, दुर्गंधयुक्त प्रदूषणयुक्त पाणी ट्रम्प यांच्या नजरेस पडू नये, म्हणून त्यामध्ये गंगेचे ५०० क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय उ. प्रदेश जलसिंचन खात्याने घेतला आहे. हे पाणी येत्या तीन दिवसांत मथुरा व नंतर २१ फेब्रुवारी रोजी आग्र्यात दुपारी पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा भारतदौरा २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी असा आहे.

आग्रा येथील ताजमहालाजवळून यमुना नदी वाहते. ही नदी गेली दोन दशके प्रदूषणग्रस्त असल्याने तिच्या स्वच्छतेबाबत अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पण या योजनांमुळे यमुना प्रदूषणमुक्त झालेली नाही. मथुरेकडून येणाऱ्या गंगा नदीचे पाणी यमुनेत सोडल्याने यमुनेच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल असे सांगितले जात आहे व त्याने पाण्याला येणारी दुर्गंधी कमी होईल असा दावा केला जात आहे.

अहमदाबाद विमानतळानजीकच्या तीन पानपट्‌ट्यांना नोटीसा

ट्रम्प अहमदाबाद भेटीवर येत असल्याने अहमदाबाद विमानतळ सर्कलनजीकच्या तीन पानपट्‌ट्यांना तेथून हटवण्याच्या नोटीसा महानगरपालिकेने पाठवल्या आहेत. ट्रम्प यांच्या नजरेस सिगारेट, विड्यांचे थोटकं, पान खाऊन थुंकलेले डाग दिसू नये ही खबरदारी पालिकेचे कर्मचारी घेताना दिसत आहेत.

या अगोदर अहमदाबाद पालिकेने ट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसून नये म्हणून मोठी भिंत बांधली होती नंतर मंगळवारी पालिकेने सुमारे ४५ झोपडपट्‌टी कुटुंबांना झोपड्या खाली करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या निशाण्यावर पानपट्‌ट्या आल्या आहेत.

ट्रम्प अहमदाबादला भेट देणार म्हणून संपूर्ण शहराची साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अहमदाबाद पालिकेचे या स्वच्छतेसाठी सुमारे एक कोटी २० लाख रु. खर्चाचे बजेट आहे. त्यापैकी अर्धी रक्कम ही सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केली जाणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0