मुलीच्या लग्नाचे वय १८ ऐवजी २१ वर्षे?

मुलीच्या लग्नाचे वय १८ ऐवजी २१ वर्षे?

नवी दिल्लीः मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा नीती आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. एनडीटीव्ही व

तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा
जेएनयूत गुंडांचा ४ तास धुडगूस, विद्यार्थ्यांना जबर मारहाण
बिहार, उ.प्रदेश, म. प्रदेश सर्वात गरीब राज्ये

नवी दिल्लीः मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा नीती आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे.

एनडीटीव्ही व इंडियन एक्स्प्रेसने कोणत्याही सरकारी हवाल्याशिवाय हे वृत्त दिले आहे.

सध्या मुलींच्या लग्नाचे वय १८ तर मुलांच्या लग्नाचे वय २१ आहे.

महिला सबलीकरणाच्या उद्देशाने महिला शिक्षण, महिला आरोग्याच्या दर्जात सुधारणा करणे, बाल मृत्यूदरात व माता मृत्यू दरात घट आणणे यासाठी नीती आयोगाने १० सदस्यांची समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष जया जेटली, नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल हे आहेत. या समितीने आपल्या अहवालात मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर करावे अशी सूचना केली होती.

गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या विवाहाच्या किमान वयोमर्यादेत बदल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या सूचनेवर शिक्कामोर्तब केले आहे.

सध्या मुलींच्या विवाहाचे किमान वय १८ निश्चित करण्यात आले आहे तर मुलांचे २१ आहे. पण माता मृत्यूदर कमी करण्याचे उद्दिष्ट्य व पोषण आहाराचा स्तर वाढवण्याच्या दृष्टीने मुलींच्या विवाहाचे किमान वय किती ठेवावे यावर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने गेल्या २ जूनमध्ये एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यात सूचित केलेल्या शिफारशीनुसार मुलींच्या विवाहाचे किमान वय निश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.

मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा वाढवल्यास माता मृत्यूदर कमी होतील, तसेच महिलांना गरोदरपणात पोषक आहाराची गरज असते. त्यांचे आरोग्य सदृढ राहावे याचा विचार करून वयात बदल केला जावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही पूर्वी सरकारला दिले होते.

सध्या हिंदू विवाह कायदा, १९५५ कलम ५(३)नुसार मुलींचे विवाहाचे किमान वय १८ तर मुलांचे वय २१ निश्चित करण्यात आले आहे. त्या खालील वयाच्या मुलामुलींचा विवाह बालविवाह ठरवला जातो.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0