उन्नाव बलात्कार घटना : आदित्य नाथ सरकारवर नाराजी

उन्नाव बलात्कार घटना : आदित्य नाथ सरकारवर नाराजी

उत्तर प्रदेश : सुमारे ९० टक्क्याहून अधिक भाजलेल्या उन्नाव बलात्कार पीडितेचे शुक्रवारी रात्री दिल्लीत निधन झाल्याने उ. प्रदेशात आदित्य नाथ सरकारविरोधात

कोरोनाचे जगभरात १ कोटीहून अधिक रुग्ण
बंगळुरू ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई
केवळ १ महिन्यात १५ लाख बेरोजगार

उत्तर प्रदेश : सुमारे ९० टक्क्याहून अधिक भाजलेल्या उन्नाव बलात्कार पीडितेचे शुक्रवारी रात्री दिल्लीत निधन झाल्याने उ. प्रदेशात आदित्य नाथ सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राज्यसरकारमधील दोन मंत्री कमल रानी वरूण व स्वामी प्रसाद मौर्य उन्नाव येथे गेले असताना त्यांना तेथे गावकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ‘तुम्ही आता कशाला आला आहात? ’, असा प्रश्न या मंत्र्यांना गावकरी विचारत होते. पण पोलिसांच्या पहाऱ्यात हे मंत्री पीडितेच्या घरी गेले व त्यांनी नातेवाईकांची भेट घेतली. हा विषय राजकारणाचा नाही असेही या मंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी महिलेच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत या प्रकरणाचा निकाल झटपट व्हावा म्हणून फास्ट ट्रॅक न्यायालयाची घोषणा केली. आरोपींना कडक शिक्षा होईल असेही ते म्हणाले. सरकारतर्फे पीडितेच्या कुटुंबियांना २५ लाख रु.ची मदतही जाहीर करण्यात आली आहे

प्रियंका गांधींची सरकारवर टीका

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दु:खात आपण  सामील असल्याची संवेदना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, या मुलीवर हल्ला करणारे भाजपशी संबंधित असल्याचे मी ऐकले आहे त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे. गेले वर्षभर या मुलीला आरोपींकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले जात होते. पण ते थांबवले गेले नाही. या राज्यात आरोपींची जागा नसल्याचे आदित्य नाथ सरकार सांगते पण प्रत्यक्षात उ. प्रदेशात महिलांनाच जागा राहिलेली नाही अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, लखनौमध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आदित्य नाथ सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करत विधानसभेच्या आवारात उपोषण सुरू केले. ते म्हणाले, राज्याच्या विधानसभेत आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना ठोकून काढण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात या राज्यात मुलीचे प्राणही ते वाचवू शकले नाहीत.

मायावतींनीही उ. प्रदेशात महिलांवर रोज अत्याचाराच्या घटना घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. रोज याच स्वरुपाच्या बातम्या ऐकायला मिळतात असे त्या म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0