कोरोनाचे संकट पण अयोध्येत राम नवमी धुमधडाक्यात होणार

कोरोनाचे संकट पण अयोध्येत राम नवमी धुमधडाक्यात होणार

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करत असताना आदित्य नाथ यांच्या उ. प्रदेश सरकारने मात्र यंदाची राम नवमी धुमधडाक्

महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित
रामजन्मभूमीची वादग्रस्त जमीन हिंदू पक्षकारांकडे तर मुस्लिमांना अन्य ठिकाणी जमीन
बाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करत असताना आदित्य नाथ यांच्या उ. प्रदेश सरकारने मात्र यंदाची राम नवमी धुमधडाक्यात साजरी करण्यास परवानगी दिली आहे. राम नवमी येत्या २५ तारखेला असून हा उत्सव २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक अयोध्येत येणार असून त्याचे थेट प्रक्षेपणही दूरदर्शनवरून केले जाणार आहे.

अयोध्येतील मुख्य वैद्यकीय अधिकार घनश्याम सिंग यांनी कोरोनाची साथ लक्षात घेऊन असा उत्सव करण्यास सरकारने परवानगी देऊ नये असे पत्र सरकारला पाठवले होते. अयोध्येत लाखो लोक जमले तर प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्याएवढे मनुष्यबळ व वैद्यकीय व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने यास परवानगी देऊ नका, अशी सिंग यांनी सरकारला विनंती केली होती. पण या विनंतीकडे दुर्लक्ष करून आदित्य नाथ यांच्या आदेशानुसार राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आदेश आल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी राम जन्मभूमीचा खटला आपल्या बाजूने लागल्यामुळे भाविकांमध्ये एक प्रकारचा उत्साह पसरला आहे, या उत्साहावर विरजण घातल्यास कडव्या हिंदूत्ववादी संघटना सरकारच्या विरोधात जातील अशी भीती असल्याने राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जाणार असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका बदलली असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येईल, त्यांचे प्रबोधनही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार हे मंदिरनिर्माण समितीचे एक सदस्यही आहेत, त्यांनी राम नवमीचा उत्सव पूर्वीच ठरला होता आणि तो रद्द करण्याचे सरकारचे कोणतेच प्रयोजन नाही पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेईल असे सांगितले.

महंत परमहंस सरकारच्या निर्णयावर खूष

राम नवमी उत्सवावर बंदी घातली असती तर हिंदूंच्या भावना दुखावल्या असत्या पण सरकारने असे काही केले नाही. हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आता प्रभू श्रीराम मुक्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया महंत परमहंस यांनी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0