अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांकडून १,२२७ कोटींच्या देणग्या

अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांकडून १,२२७ कोटींच्या देणग्या

नवी दिल्लीः गेल्या दोन दशकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या अमेरिकेतील ७ संघटनांनी हिंदू धर्मप्रसार, हिंदू जीवनपद्धती पुनरुज्जीवनाचे प्रक

भौगोलिक निर्देशकांचा गुंता : भाग ४
गर्भपातबंदी कायदा : उलटा प्रवास सुरू
अमेरिका आणि खडाखडी

नवी दिल्लीः गेल्या दोन दशकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या अमेरिकेतील ७ संघटनांनी हिंदू धर्मप्रसार, हिंदू जीवनपद्धती पुनरुज्जीवनाचे प्रकल्प, हिंदूंच्या हितांसाठीच्या कायदे आदींसाठी भारतात १,२२७ कोटी रु.ची स्वरुपात आर्थिक मदत पाठवली आहे. ही माहिती साऊथ एशिया सिटीझन वेबने आपल्या ९३ पानांच्या अहवालात दिली आहे. या ७ प्रमुख संघटनांची नावे ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा, एकल विद्यालय फाउंडेशन ऑफ अमेरिका, इंडिया डेव्हलमेंट अँड रिलिफ फंड, परम शक्ती पीठ, पीवायपी योग फाउंडेशन, विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका व सेवा इंटरनॅशनल अशी आहेत.

या अहवालात अमेरिकेतील हिंदुत्व सिविल सोसायटींनी भारतात पाठवलेल्या आर्थिक स्रोतांची माहिती दिली आहे. भारतातील कायदे प्रभावित करण्यासाठी अमेरिकेतील अनेक हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या असून पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम बदल, हिंदू धर्म, इतिहास, परंपरा, संस्कृती यांचा शिक्षण प्रसार, परराष्ट्र नीती आदींवर सर्वाधिक खर्च केला जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

जगभरात गोऱ्यांच्या वर्णवर्चस्ववाद लाटेची चर्चा होत आहे, रशियाकडून खोट्या माहितीचा प्रसार वेगाने होत आहे, ही प्रचार यंत्रणा अमेरिकेतील हिंदुत्ववादी संघटनांनी अंगिकारली असल्याचे या अहवालाचे निरीक्षण आहे.

अमेरिकेत सध्या २४ हिंदुत्ववादी संघटना कार्यरत असून या संघटनांपैकी आरएसएसशी निगडित असलेल्या ७ संघटनांकडून २००१ ते २०१९ या काळात सुमारे १५ कोटी ८९ लाख डॉलर इतकी रक्कम भारतात पाठवण्यात आली आहे. या मदतीतील सुमारे ५३ टक्के रक्कम म्हणजे ८ कोटी ५५ लाख डॉलर रक्कम २०१४ ते २०१९ या काळात भारतात पाठवण्यात आली आहे.

अमेरिकेत हिंदुत्ववादी संघटनांचा पसारा कसा पसरला आहे त्याची माहिती कर संकलन आकडेवारी, सरकारकडून मिळालेली माहिती, सार्वजनिक जाहिराती, वेबसाइट व बातमी पत्रे अशा माध्यमातून गोळा करण्यात आली आहेत.

काही संघटनांचे जाळेही एनजीओ सारखे आहे. भारतातल्या आरएसएसशी संबंध असलेल्या अमेरिकेतल्या हिंदू स्वयंसेवक संघाचे तीन ट्रस्टी हे धर्म सिव्हिलायझेशन फाउंडेशन या संघटनेचेही ट्रस्टी आहेत. २०१२ ते २०१६ या काळात धर्म सिव्हिलायझेशन फाउंडेशनने अमेरिकेतल्या ३ शैक्षणिक संस्थांना सुमारे १ कोटी ३० लाख डॉलर रक्कम मदत म्हणून दिली आहे. तर द हिंदू अमेरिकन पोलिटिकल अँक्शन कमिटीने २०१२ ते २०२० या दरम्यान सुमारे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठी सुमारे १,७२००० डॉलर इतकी रक्कम दिली आहे. अमेरिका काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती व एसएसीडब्लू या दोघांनाच या संघटनेकडून सुमारे १,१७००० डॉलर रक्कम मदत म्हणून मिळालेली आहे. अमेरिकेत हिंदू राष्ट्रवादी भूमिकेला महत्त्व असावे या उद्देशाने कृष्णमूर्ती काम करत असतात. २०१९च्या ह्युस्टन येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हाऊ डी मोदी या कार्यक्रमात कृष्णमूर्ती हे केवळ एकमेव अमेरिकी काँग्रेस सदस्य उपस्थित होते.

कृष्णमूर्तींप्रमाणे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या एक उमेदवार तुलसी गबार्ड यांनाही २०१४ ते २०२० या काळात १,१०,००० डॉलर इतकी मदत देण्यात आली आहे. याच काळात कॅलिफोर्नियातील डेमोक्रेट पक्षाचे सदस्य ब्रॅड शेरमन यांना २७ हजार डॉलरची आर्थिक मदत देण्यात आली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0