छत्तीसगढऐवजी उ. प्रदेश पोलिसांद्वारे पत्रकार रंजन यांना अटक

छत्तीसगढऐवजी उ. प्रदेश पोलिसांद्वारे पत्रकार रंजन यांना अटक

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल झी न्यूजचे टीव्ही अँकर रोहित रंजन यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी

फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार
छत्तीसगडः शेणखरेदी निर्णयावर संघ खूश, भाजप नाखूष
२०१९-२० जीडीपी ५ टक्केच, १० वर्षातला नीचांक

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल झी न्यूजचे टीव्ही अँकर रोहित रंजन यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ जुलै रोजी अटक केली. छत्तीसगढ पोलीस या प्रकरणात रंजन यांना अटक करण्यासाठी त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोहोचल्यानंतर काही तासांत उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. रंजन यांच्या वाहिनीने राहुल यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित केला होता आणि नंतर त्याबद्दल माफीही मागितली होती.

छत्तीसगढ पोलीस रंजन यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावरून झालेल्या वादावादी व धक्काबुक्कीचे व्हिडिओ, सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, छत्तीसगढ पोलीस पहाटे साडेपाच वाजता रंजन यांच्या घरी पोहोचले. स्थानिक पोलिसांना माहिती न दिल्याचे ट्विट करत रंजन यांनी उत्तर प्रदेश पोलिसांतील अधिकारी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना टॅग केले. यावर स्थानिक पोलिसांना माहिती देणे आवश्यक नाही असे उत्तर छत्तीसगढ पोलिसांनी दिले व रंजन यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

मात्र, त्याच वेळी गाझियाबाद पोलीस रंजन यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी रंजन यांना ताब्यात घेऊन छत्तीसगढ पोलिसांद्वारे होणारी अटक टाळली.

विविध समूहांमध्ये शत्रुत्वाच्या भावनेला खतपाणी घातल्याप्रकरणी तसेच लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रंजन व झी न्यूजमधील अन्य काही जणांच्या विरोधात ३ जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आली. काँग्रेस आमदार देवेंद्र यादव यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल केल्याचे रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक गट तयार करून, आरोपीला अटक करण्यासाठी या गटाला गाझियाबादला पाठवल्याचेही अग्रवाल म्हणाले. कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करून रायपूर पोलिसांचा गट पहाटे गाझियाबादला रंजन यांच्या घरी पोहोचला. त्यांच्याकडे पात्र न्यायालयाने जारी केलेले वॉरंट होते. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करत असताना, स्थानिक पोलीस आले व त्यांनी आरोपीला बळजबरीने आपल्या ताब्यात घेतले. रायपूर पोलिसांकडे वॉरंट असूनही त्यांच्या कामात अडथळा आणला गेला, असे अग्रवाल म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयातील एसएफआयच्या हल्ल्याबद्दलचे राहुल यांचे विधान रंजन यांच्या शोमध्ये प्रसारित करण्यात आले होते. राहुल यांनी उदयपूरमधील कन्हय्यालाल यांच्या हत्येवर टिप्पणी केली असे या व्हिडिओत वाटत होते.

त्यानंतर वाहिनीने याबाबत माफीही मागितली. रंजन म्हणत होते, “काल आमच्या डीएनए या शोमध्ये राहुल गांधी यांचे विधान चुकीच्या संदर्भात वापरले गेले आणि त्याचा संबंध उदयपूर हत्येशी जोडण्यात आला. ही मानवाकडून झालेली चूक (ह्युमन एरर) असून, त्याबद्दल आमची टीम क्षमस्व आहे.”

झी न्यूजच्या वृत्तांतावर टीका करणाऱ्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही समावेश होता.

“वायनाडमधील आपल्या कार्यालयात नासधूस करणारे बेजबाबदार वागले. ती लहान मुले आहेत, त्यांना माफ करा, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र, टीव्ही वाहिनीने राहुल यांचे विधान उदयपूरमधील टेलरच्या हत्येबाबत आहे असा भास निर्माण केला,” असे गेहलोत म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0