गेल्या आठवड्यात राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैय्यालाल या एका शिंप्याची मोहम्मद घौस व रियाज अत्तारी दोन मुस्लिम कट्टरवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. कन
गेल्या आठवड्यात राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैय्यालाल या एका शिंप्याची मोहम्मद घौस व रियाज अत्तारी दोन मुस्लिम कट्टरवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. कन्हैय्या लाल याचा खून करतानाचा व्हीडिओ या दोघांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना प्रसार माध्यमातून आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. राजस्थान पोलिसांनी तत्काळ या दोघांना राजसमंद येथून ताब्यात घेतलं. केंद्राने घटनास्थळी राष्ट्रीय तपास यंत्रणेची टीम पाठवून हे प्रकरण दहशतवादी कृत्य असल्याचे सांगितले व इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या कार्यपद्धतीशी हे खून प्रकरण मिळतेजुळते असल्याचे सांगितले.
या घटनेनंतर ज्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या प्रेषित पैगंबरांविषयीच्या अवमानजनक टिप्पण्णी वरून हे प्रकरण घडले त्याला सर्वस्वी नुपूर शर्मा याच जबाबदार असून त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
या घटनांमध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे कन्हैय्या लाल यांचा खून करणारा एक आरोपी रियाज अत्तार याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. रियाज अत्तार भाजपचे राजस्थानमधील सर्वात ज्येष्ठ नेते व सध्या प्रमुख विरोधी पक्षनेते गुलाब चंद कटारिया यांच्यासोबत एका फोटोत असल्याचे निदर्शनास आले. भाजपच्या अल्पसंख्याक गटाचे एक नेते इर्शाद चैनवाला, अत्तारी व कटारिया असा तिघांचा हा फोटो होता. या फोटोनंतर भाजपचे उदयपूरमधील एक बडे नेते रवींद्र श्रीमाळी यांच्यासोबत अत्तारीचा फोटो व्हायरल झाला. भाजपच्या नेत्यांसोबत खुनी अत्तारीचा फोटो प्रसिद्ध झाल्याने संशयाचा धूर पसरण्यास सुरूवात झाली.
कटारिया यांनी या फोटोसंदर्भात आपल्याला काही माहिती नाही, असे स्पष्ट केले. अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आपल्याला भेटत असतात, या अत्तारीला आपण ओळखत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पण फेसबुकवर नोव्हेंबर २०१९ रोजी भाजपचा एक नेता जो कटारिया यांच्या निकटचा म्हणून ओळखला जातो त्या मोहम्मद ताहीरने अत्तारी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे जाहीरपणे लिहिले होते.
त्यानंतर राजस्थानचे गृहमंत्री राजेंद्र सिंग यादव यांनी अत्तारी हा कटारिया यांचा पोलिंग एजंट असल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर कटारिया यांनी पोलिसांनी आपली चौकशी करावी अशी मागणी केली. तशी मागणी श्रीमाळी यांनीही केली. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ असे त्यांनी जाहीर केले.
आता काही प्रश्न उपस्थित होतात
उदयपूर घटनेनंतर या देशातल्या जनतेला नेमके काय चालले आहे हे कळण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात..
१. रियाझ अत्तारी कोण आहे?
२. काँग्रेसने सोशल मीडियात शेअर केलेले अत्तारी व भाजप नेत्यांचे फोटो खोटे व मॉर्फ केले आहेत का?
३. अत्तारी भाजपचा सदस्य आहे का? जर तो असेल तेव्हा कन्हैय्या लाल यांचा खून झाला तेव्हाही तो भाजपचा सदस्य होता का?
४. अत्तारी हा डबल एजंट म्हणून भारत किंवा दहशतवादी गटाचे काम करत होता का?
५. कन्हैय्या लाल खून प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने राजस्थानच्या पोलिसांकडून अत्यंत वेगाने का काढून घेतला? त्यांना या प्रकरणातून केंद्र सरकार वा भाजपला अडचणी येतील याची धास्ती वाटत होती का?
भाजपच्या नेत्यांसोबत रियाझ अत्तारीचा फोटो प्रसिद्ध होणे ही घटना एवढीच मर्यादित नाही तर काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी लष्कर कमांडर म्हणून ज्या दहशतवाद्याला अटक केली आहे तो भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचा सोशल मीडियाचा प्रभारी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
सविस्तर बातमी
COMMENTS