शेतकरी आंदोलन मागे

शेतकरी आंदोलन मागे

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन गुरुवारी शेतकरी संघटनांनी म

१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित
२६ जानेवारीला दिल्लीत नेमकं काय घडलं?
वैकल्पिक ‘किसान गणतंत्र परेड’चे जनक नरेंद्र मोदी

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेले दिल्लीच्या वेशीवरचे शेतकरी आंदोलन गुरुवारी शेतकरी संघटनांनी मागे घेतले. सर्व आंदोलक ११ डिसेंबरपासून आपल्या घरी जाण्यास निघतील.

आंदोलन मागे घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता एक फतह अरदास (विजय प्रार्थना) म्हटली जाईल. नंतर ११ डिसेंबरला सिंघु व टिकरी या सीमेवर धरणे धरलेले आंदोलक फतह मिरवणूक काढणार आहेत. १५ डिसेंबरला शेतकरी नेते अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून दर्शन घेतील. त्यानंतर पुढील वर्षी १५ जानेवारीला दिल्लीत संयुक्त किसान मोर्चा या संघटनेची एक बैठक होणार आहे.

गेले दोन दिवस शेतकरी आंदोलन समाप्त होण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या. केंद्र सरकारने मंगळवारी आंदोलक नेत्यांना आश्वासनाचे एक पत्र पाठवले होते. त्यात सरकार शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असून किमान हमीभावाच्या मुद्द्यावर सरकार समिती स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे आश्वासन होते. त्याच बरोबर शेतकरी आंदोलनात ज्या आंदोलकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत, ते विनाशर्त मागे घेणे, या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे, वीजबील मागे घेणे, शेत कचर्याचे विधेयक मागे घेणे या मुद्द्यांवर सरकार चर्चेस तयार असल्याचे सांगण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0