५ वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै रोजी

५ वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २० जुलै २०२२ ऐवजी आता रविवार ३१ जुलै २०२२ रो

बिहार: एकाला १०० पैकी १५१ गुण, तर दुसरा शून्य गुण मिळवूनही उत्तीर्ण
‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज
जामिया हिंसाचारः वर्षभरात एकही गुन्हा दाखल नाही

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २० जुलै २०२२ ऐवजी आता रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा २० जुलै २०२२ ऐवजी रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येईल.

यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ३१ जुलै २०२२च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: