मुंबईत ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा पहाटेचा वापर बंद

मुंबईत ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा पहाटेचा वापर बंद

मुंबईः येत्या ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे बंद न झाल्यास मशिदींपुढे हनुमान चालिसा म्हणण्यात येईल असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी द

कंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप
अक्षय्य ऊर्जेसमोर वातावरण बदलाचे आव्हान, सौर ऊर्जेत घट अपेक्षित
पल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका

मुंबईः येत्या ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे बंद न झाल्यास मशिदींपुढे हनुमान चालिसा म्हणण्यात येईल असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मुंबई शहरातील ७२ टक्क्याहून अधिक मशिदींनी पहाटेची अजानसाठी भोंगे वापरणे बंद केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी शहरातील मशिदींच्या केलेल्या सर्वेक्षणात पहाटे ५ वाजता भोंग्यामार्फत देण्यात येणारी अजान बंद करण्यात आल्याचे सांगितले. तर काही मशिदींनी आपल्या मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी सर्व धर्माच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी चर्चाही झाली. शहरात कायदा व सुव्यवस्था पाळणे सर्वांची जबाबदारी असून भोंग्यांसाठी आता पोलिसांची परवानगी सक्तीची आहे. त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्याविषयी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालनही सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

राज्य गृहमंत्री सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावणार

मुंबई शहर व उर्वरित राज्यात मशिदीवरील भोंग्याच्या विषयावरून तणाव वाढू नये म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांकडून सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत मशिदीवरील भोंगे, सार्वजनिक पातळीवर कायदा व सुव्यवस्थेचे पालन यावर सर्वपक्षीय सहमती सरकारला अपेक्षित आहे. या बैठकीला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही बोलावण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजवू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश काढले आहेत. पोलिसांनी सायलेंट झोनमधल्या धार्मिक स्थळांना तसेच अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0