मुख्यमंत्र्यांवर मानहानी, फसवणुकीचे खटले चालणार

मुख्यमंत्र्यांवर मानहानी, फसवणुकीचे खटले चालणार

मुंबई : २०१४च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात फसवणूक, मानहानी व बनावट कागदपत्रासंदर्भात दाखल झालेले गुन्हे लपून ठेवल्याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद

बिहार मुख्यमंत्रीपदः अमित शहा इतके मवाळ का?
‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला
एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी

मुंबई : २०१४च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात फसवणूक, मानहानी व बनावट कागदपत्रासंदर्भात दाखल झालेले गुन्हे लपून ठेवल्याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्याची मंजुरी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली.

वकील सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. या पूर्वी उके यांनी मुंबई उच्च न्यायालयात फडणवीस यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप करत फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या जुलै महिन्यात न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आता हा खटला सुरू होणार असल्याने ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांना हा मुद्दा मिळाला आहे.

फडणवीस यांच्यावरचे फसवणूक, मानहानीचे गुन्हे हे १९९६ व १९९८मध्ये नागपूर येथे दाखल झाले होते पण त्यासंदर्भात अजून आरोपपत्र न्यायालयात सादर केलेले नव्हते. उके यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कायदा ‘१९५१ कलम १२४ अ’चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0