कोलकाता : धर्मनिरपेक्षतेबाबत माझ्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत पुनर्विचार करेन, असे विधान प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष व ने
कोलकाता : धर्मनिरपेक्षतेबाबत माझ्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत पुनर्विचार करेन, असे विधान प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी गुरुवारी केले. मी भाजपच्या मंचावरून धर्मनिरपेक्षता व सर्वसमावेशकता मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. 2016मध्ये मी भाजपचा सदस्य झालो. त्यावेळी मी भाजपमध्ये का आलो याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. ते दोघे माझ्या भूमिकेवर सहमतही झाले होते. पण आता मला नेताजींच्या राजकीय मार्गावर वाटचाल करता येत नाही असे वाटू लागले आहे. जर पुढे हे कठीण वाटू लागल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत मला विचार करावा लागेल, पण जो काही निर्णय होईल त्याअगोदर मोदींशी मी नक्की चर्चा करणार आहे, असे बोस यांनी सांगितले.
गेले काही दिवस वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून चंद्र कुमार बोस हे भाजपच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी विधाने करत आहेत.
आम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला दहशतवाद पसरवणारे राजकारण करता येणार नाही. जनतेला योग्य-अयोग्य काय आहे ते सांगणे आपले कर्तव्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे फायदे जनतेशी चर्चा करून त्यांना सांगितले पाहिजेत, अशी विधाने बोस यांनी केली होती.
त्याचबरोबर बोस यांनी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेने संमत केल्याने त्याची अंमलबजावणी करावी लागते पण लोकशाही स्वीकारलेल्या देशात कोणताही कायदा जनतेवर थोपवून चालत नाही, असेही त्यांनी विधान केले होते.
मूळ बातमी
COMMENTS