१८ ते ५९ वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर डोस

१८ ते ५९ वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर डोस

नवी दिल्लीः कोरोना महासाथीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बुधवारी केंद्र सरकारने ७५ दिवस सर्वसामान्य जनतेला मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केली.

‘कोविडचा धोका कायम; लसीकरणाचा वेग वाढवा’
वादग्रस्त लशींच्या वापराबाबत केंद्र सरकार ठाम
महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत

नवी दिल्लीः कोरोना महासाथीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बुधवारी केंद्र सरकारने ७५ दिवस सर्वसामान्य जनतेला मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. मोफत बूस्टर डोस हे १५ जुलैपासून पुढे ७५ दिवस १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना मिळतील. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जाहीर केला. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्याचे औचित्य साधून नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

या पूर्वी सरकारने कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याचा कालावधीही कमी केला आहे. पूर्वी ९ महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. तो आता ६ महिन्यांचा ठेवण्यात आला आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच बूस्टर डोस देण्यात येत होता. १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस खासगी वा कोविड लसीकरण केंद्रातून दिले जात होते. तर ६० वर्ष व त्या वरील वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस सरकारच्या कोणत्याही कोविड लसीकरण केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0