ज्यो बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, कमला हॅरिस उपाध्यक्ष

ज्यो बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, कमला हॅरिस उपाध्यक्ष

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष असतील. पेनसिल्व्हेनिया येथील २० इलेक्ट्रोरल मते बायडेन यांच्या खात्यात जाणार असल्याने अध्यक्षपदासाठी आवश्यक असणारा २७० चा आकडा सहज पार करत २७३ आकडा गाठतील.

आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत
पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात ५ व १० रु.ची कपात
लवादांवरील नियुक्त्या : सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष असतील. पेनसिल्व्हेनिया येथील २० इलेक्ट्रोरल मते बायडेन यांच्या खात्यात जाणार असल्याने अध्यक्षपदासाठी आवश्यक असणारा २७० चा आकडा सहज पार करत २७३ आकडा गाठतील.

अमेरिकेचे अध्यक्ष होण्याआधी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे उपाध्यक्षपद भूषवले होते.

बायडेन हे डेलवर येथील सिनेटर आहे. आपल्या पूर्ण प्रचारात बायडेन यांनी ‘अमेरिकेचा आत्मा’ संकटात आला असल्याचा मुद्दा मांडला होता. विद्यमान अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या विखारी प्रचाराला अत्यंत संयतपणे, समंजसपणे त्यांनी उत्तर दिले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत त्यांनी ट्रम्प यांना दुसर्यांदा अध्यक्ष होण्यापासून रोखले.

कमला हॅरिस अमेरिकेच्या नवा उपाध्यक्ष

भारतीय वंशाच्या अमेरिकी कमला हॅरिस या अमेरिकेच्या नव्या उपाध्यक्ष असतील. अमेरिकेच्या इतिहासातल्या पहिल्या कृष्णवर्णिय व भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. हॅरिस या २०१७पासून कॅलिफोर्निया येथील सेनेटर आहेत.

कमला हॅरिस यांचे आई जमैका देशाची तर वडील भारतीय आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0