बंडखोर बेनीवालांचा २६ डिसेंबरला २ लाखांचा मोर्चा

बंडखोर बेनीवालांचा २६ डिसेंबरला २ लाखांचा मोर्चा

जयपूरः मोदी सरकारच्या ३ शेती कायद्यांना विरोध म्हणून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे

शेतकरी आंदोलनात ट्रॉली टाईम्स, ‘सांझी तत्थ’ आणि ग्रंथालय
धुमसता पंजाब
‘बाजार समित्या, हमी भाव बंद होणार नाही’

जयपूरः मोदी सरकारच्या ३ शेती कायद्यांना विरोध म्हणून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे संयोजक व लोकसभा खासदार हनुमान बेनीवाल यांनी केली आहे. त्यांनी ३ संसदीय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे.

बेनीवाल सत्तारुढ एनडीए आघाडीत असून ते राजस्थानमधील नागौर येथून लोकसभेवर निवडून आले आहेत. बेनीवाल येत्या २६ डिसेंबरला २ लाख शेतकर्यांचा मोर्चा घेऊन दिल्लीला कूच करणार आहेत. या मोर्चानंतर एनडीएमध्ये आपण राहणार की नाही, याची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेनीवाल लोकसभेतील उद्योग संबंधित स्थायी समिती, याचिका समिती व पेट्रोलियम-नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या समितीवर सदस्य आहेत, त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवून दिला आहे.

आपण शेतकर्यांच्या हिताचे अनेक मुद्दे सरकारपुढे उपस्थित केले होते पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमचा शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणून संसदीय समित्यांचे राजीनामे देत असल्याचे, बेनीवाल यांनी सांगितले.

राजस्थानमधील नागौर व बारमेर जिल्ह्यात तरुण व जाट समाजात बेनीवाल यांचे वर्चस्व मानले जाते. ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे कडवे विरोधक मानले जातात. त्यांच्याविरोधात जाऊन बेनीवाल यांनी स्वतःचा आरएलपी पक्ष स्थापन केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत आरएलपी व भाजप एकत्र आले होते पण या पक्षाने (बेनीवाल यांची) एकच जागा जिंकली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0