‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’

‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान व अन्य दोन व्यक्ती अरबाज मर्चंट व मूनमून धमेचा यांनी कोणताही कट रचून अमली पदार्थाचे सेवन केल

वानखेडे यांची खाजगी फौज – मलिक
कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट
आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान व अन्य दोन व्यक्ती अरबाज मर्चंट व मूनमून धमेचा यांनी कोणताही कट रचून अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. आर्यन खानच्या व्हॉट्स अप संभाषणात तसा काही आक्षेपार्हही मजकूर नाही. आणि तसे पुरावे एनसीबी सादर करू शकलेले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. आर्यन खानसह अन्य दोघांच्या जामीनाच्या आदेशाची प्रत आता सार्वजनिक स्तरावर उपलब्ध झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण एकूणच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर बोट ठेवणारे आहे.

न्यायालयाने जामीन आदेशात म्हटले आहे की, आर्यन खान, अरबाज व मूनमून हे तिघे बेकायदा कृत्य करण्यासाठी एकत्र जमले होते, असा कोणताही ठोस पुरावा एनसीबीला सादर करता आलेला नाही. हे तिघे स्वतंत्र प्रवास करत होते, असे एनसीबीच्या तपासातून लक्षात येते. कटकारस्थान रचल्याचा एखादा सबळ पुरावा सादर करायला लागतो व तो एनसीबी सादर करू शकलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आर्यन खान, अरबाज व मूनमून हे क्रूझवर एकत्र प्रवास करत होते हा आधार त्यांनी कटकारस्थान रचले आहे, हे सिद्ध करू शकत नाही आणि एनसीबीने आरोप केले म्हणजे त्यावर आम्ही विश्वास ठेवावा हे आमच्यावर बंधनकारक नाही, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0