वानखेडे यांची खाजगी फौज – मलिक

वानखेडे यांची खाजगी फौज – मलिक

‘एनसीबी’चे विभागीय संचालक यांची खाजगी माणसांची फौज असून, त्याद्वारे आर्यन खान याचे अपहरण करण्याचा डाव होता, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’
आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी
ड्रग्ज प्रकरणे हाताळण्याचा एनसीबी ‘पॅटर्न’

आर्यन खान याचे अपहरण करून त्याला ड्रग प्रकरणात अडकवण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा डाव होता. ही सगळी समीर वानखेडे यांची फौज असून, आर्यन खान प्रकरणाचा सूत्रधार भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष मोहित कंभोज असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“पैसे दिल्यामुळे तुला आरोपी बनवू, अशी धमकी शाहरुख खानला देण्यात आली आहे. पीडित कधी आरोपी नसतो. शाहरुख खानला पहिल्या दिवसापासून घाबरवण्यात येते होते. जर नवाब मलिकांनी बोलणे बंद केले नाही तर तुझा मुलगा भरपूर वेळ आत राहिल. पूजा ददलानीचे प्रकरण समोर आले आहे. मुलासाठी खंडणी दिली म्हणजे गुन्हेगार होत नाही. ज्या ज्या कोणाला असे अनुभव आले आहेत, त्यांनी पुढे यावे आणि सत्य सांगावे,” असे नवाब मलिकांनी म्हटले.

वानखेडे यांची खासगी फौज सक्रिय आहे, ते महिलांनाही धमकावतात, असा आरोप मलिक यांनी केला. या खाजगी फौजेमध्ये कंभोज यांच्यासह सुनील पाटील, मनीष भानुशाली, किरण गोसावी यांचा समावेश आहे.

“माझ्याकडे विजय पगारेही आले होते. त्यांनी लीला हॉटेलमधल्या काही गोष्टी मला सांगितल्या. मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसुजा द ललित हॉटेलमध्ये तिथे मजा करायचे. वानखेडेंना वाटलं की ही गोष्ट उद्या सांगितली जाणार आहे तर कंबोजच्या माध्यमातून आधीच सांगुयात. म्हणून काल पत्रकार परिषद घेण्यात आली”, असे मलिक म्हणाले.

या प्रकरणामध्ये चर्चेत आलेला सॅम डिसोजा याचे खरे नाव सॅनविल डिसोजा असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ते म्हणाले. “सॅम डिसोजा कोण आहे याचीही तुम्ही थोडी माहिती घ्या. तो सॅम डिसोजा नसून सॅनविल डिसोजा आहे. वीड बेकरी केस झाली होती, ज्यात सचिन टोपे आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाता पाचवा आरोपी सॅम डिसोजा आहे. त्याच्या गुगल पेमधून सचिन टोपेच्या पत्नीला पेमेंट झाल्याचे पुरावे आहेत. २३ जूनला सॅम डिसोजाला एनसीबीच्या कार्यालयात भेटण्याची नोटीसही दिली गेली होती”, असे मलिक म्हणाले.

आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. “प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंभोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं तयार करण्यात आले. तिथे आर्यन खानला पोहोचवले गेले. आर्यन खानचे अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असे मलिक म्हणाले.

स्मशानभूमीत आपला कुणीतरी पाठिंबा करत असल्याचा दावा वानखेडेंनी केला होतं. ७ तारखेला मोहीत कंभोज आणि वानखेडे स्मशानभूमीच्या बाहेर भेटले. तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की एक गाडी आली, त्यात बॉडिगार्ड होते. एक दाढीवाला त्यांना भेटला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0