‘वाईट वाटते की राष्ट्रपती पहाटे ४ वाजता उठले’

‘वाईट वाटते की राष्ट्रपती पहाटे ४ वाजता उठले’

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी पहाटे झालेल्या नाट्याला राज्यपाल, पंतप्रधान आणि राष्ट्रपती जबाबदार असून या नाटकात राष्ट्रपती पहाटे ४

चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी
चिदंबरम २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत
चिदंबरम यांची तिहारमध्ये रवानगी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी पहाटे झालेल्या नाट्याला राज्यपाल, पंतप्रधान आणि राष्ट्रपती जबाबदार असून या नाटकात राष्ट्रपती पहाटे ४ वाजता उठून सामील झाल्याबाबत वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया माजी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दिली.

आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज बुधवारी दिल्ली न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावत त्यांची न्यायालयीन कोठडी ११ डिसेंबरपर्यंत वाढवली. त्यानंतर न्यायालयाबाहेर पडताना चिदंबरम यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

चिदंबरम यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर खात्यावरूनही महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यावर टीका केली होती. ‘राष्ट्रपतींना पहाटे ४ वाजता उठवून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवणे हे राष्ट्रपती भवनाला शोभत नाही. ते सकाळी ९ वाजेपर्यंत थांबू शकले असते, असा टोला चिदंबरम यांनी ट्विटमधून मारला होता. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या तीन दिवसात जो गोंधळ घातला गेला ती राज्यघटनेच्या मूल्यांची पायमल्ली होती असे चिदंबरम म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0