नवी दिल्लीः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची बदनामी करणारा मजक
नवी दिल्लीः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची बदनामी करणारा मजकूर ट्विटरवर लिहिल्याप्रकरणी समीत ठक्कर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीत ठक्कर यांनी ट्विटरवर आदित्य ठाकरे यांना उद्देशून ‘पेग्विन बेटा’, ‘बेबी पेग्विन’ असे शब्द वापरले व या शब्दावरून ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला होता.
समीत ठक्कर यांनी १ जून, ३० जून व १ जुलै रोजी असे ट्विट केले होते. पण या विषयीची तक्रार १३ जुलै रोजी मुंबईत व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब तर आदित्य ठाकरे यांना मुहम्मद आजम शहा (औरंगजेबचा मुलगा) असे म्हटले. त्यासंदर्भातही ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठक्कर यांचे ट्विटर अकाउंटवर ४४ हजार फॉलोअर असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा समावेश आहे.
मूळ बातमी
COMMENTS