चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

काँग्रेसचे पंजाबमधील महत्त्वाचे नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी या स्वरूपाचे ट्विट

सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार
डॉ. कफील खान यांची त्वरित सुटका करण्याचे आदेश
‘द ग्रेट हॅक’ – माहितीकांडाचा असाही वेध

काँग्रेसचे पंजाबमधील महत्त्वाचे नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी या स्वरूपाचे ट्विट केले आहे.

काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. पंजाबचे अनेकवर्षे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर आज दिवसभर चाललेल्या कॉँग्रेसच्या  बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केले.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. सर्वाधिक चर्चा सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची होती. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील.

चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही. ”

पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चन्नी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे माजी मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत म्हणून त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आवाज उठवला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: