‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’

‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’

नवी दिल्ली : देशात येत्या जून व जुलै महिन्यात कोरोना साथीने उच्चांक गाठला असेल त्यानंतर ही साथ कमी होत जाईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांन

स्वच्छता कर्मचारी सर्वांत असुरक्षित!
देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण
उत्तराखंडमध्ये परदेशी पर्यटकांना शालेय शिक्षा

नवी दिल्ली : देशात येत्या जून व जुलै महिन्यात कोरोना साथीने उच्चांक गाठला असेल त्यानंतर ही साथ कमी होत जाईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार सध्या जी दिवसांगणिक आकडेवारी हाती मिळत आहे, त्यानुसार कोरोना विषाणू संक्रमण जून व जुलैमध्ये सर्वोच्च असेल आणि लॉकडाऊनमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, असे डॉ. गुलरिया यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसत असल्याने त्याचे परिणाम जून-जुलैनंतर दिसू लागतील व या साथीचा प्रसार कमी होत जाईल, पण ही जागतिक महासाथ किती काळ राहील याविषयी कोणतेही भाकीत करणे या घडीला अशक्य आहे, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्याने कोरोनाचे रुग्ण अधिक दिसत आहेत पण काही ठिकाणी रुग्णांची संख्या वाढल्याची दिसत आहे. पण कोरोना हॉटस्पॉटवर नजर ठेवल्यास कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होत जाईल, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

डॉ. गुलेरिया यांनी असेही सांगितले की, भारतातील कोरोना संक्रमणाचा अंदाज हा मॉडलिंग डेटावर आधारित आहे, त्यामध्ये गणितीय वाढ पाहिली जाते व त्यानुसार अंदाज वर्तवला जातो. पूर्वी मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात देशातील कोरोना संक्रमणाचा वृद्धी दर ४.५ टक्के इतका असून आकड्यांकडे पाहिल्यास कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि ही संख्या वाढत जाईल. या विषाणूचे संक्रमण कमी दिसत असले तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा काळात लॉकडाऊनचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. जर लोकांनी एकत्र जमण्यास सुरूवात केली, शारीरिक अंतर ठेवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. कोरोनाचा आलेख हा अपेक्षेनुसार समतल दिसू लागला आहे पण समतल असूनही रुग्णांची संख्या वाढणे हा चिंतेचा विषय आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0