आठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न १३७३.७८ कोटी, भाजपचा वाटा ५५ टक्के

आठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न १३७३.७८ कोटी, भाजपचा वाटा ५५ टक्के

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, या निवडणूक सुधारणांसाठी काम करणार्‍या संस्थेने म्हटले आहे की भाजपने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७५२.३३ कोटी रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न दाखवले आहे. यानंतर काँग्रेस २८५.७६ कोटींच्या उत्पन्नासह दुसऱ्या स्थानावर आणि सीपीआय(एम) १७१.०४ कोटींच्या उत्पन्नासह दुसऱ्या स्थानावर आहे.

हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे!
हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी
प्रियंकांना नोटीस; अडवाणी-जोशी नियमाला अपवाद

नवी दिल्ली: आठ राष्ट्रीय पक्षांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण १३७३.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे, ज्यामध्ये भाजपचा वाटा सुमारे ५५ टक्के आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या संस्थेने आपल्या अभ्यासात ही माहिती दिली आहे.

भारतीय जनता पार्टी (भाजप), काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय-एम), तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी ( NPP) निवडणूक आयोगाची मान्यता असलेले आठ राष्ट्रीय पक्ष आहेत.

एडीआरने एका निवेदनात म्हटले आहे की आठ राष्ट्रीय पक्षांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतातून एकूण १३७३.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केले आहे.

निवडणूक आयोगासमोर राजकीय पक्षांनी सादर केलेल्या तपशिलांचा हवाला देऊन, एडीआरने म्हटले आहे की भाजपने राष्ट्रीय पक्षांमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वाधिक ७५२.३३ कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. एडीआरने म्हटले आहे की भाजपचे उत्पन्न २०२०-२१ या आर्थिक वर्षातील आठ राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ५४.७६ टक्के आहे.

काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २८५.७६ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले, जे राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या २०.८० टक्के आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यानंतर, सीपीआय(एम) ने १७१.०४ कोटी रुपये आणि तृणमूल काँग्रेसने ७४.४१ कोटी रुपये उत्पन्न घोषित केले. त्यानंतर बसपा (५२.४६ कोटी), राष्ट्रवादी (३४.९२ कोटी), सीपीआय (२.१२ कोटी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (६९ लाख) यांचे उत्पन्न आहे.

२०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांच्या दरम्यान भाजपचे उत्पन्न ७९.२४ टक्क्यांनी घटून ३,६२३.२८ कोटी रुपयांवरून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७५२.३३ कोटी रुपयांवर आले आहे. काँग्रेसचे उत्पन्न २०१९-२० या आर्थिक वर्षातील ६८२.२१ कोटी रुपयांवरून २०२०-२१ या आर्थिक वर्षात २८५.७६  कोटी रुपयांवर ५८.११ टक्क्यांनी घसरले.

द हिंदूच्या मते, भाजपने आपल्या उत्पन्नाच्या ८२ टक्के खर्च केला, तर काँग्रेसने आपल्या कमाईच्या ७३.१४ टक्के खर्च केला. त्याच वेळी, तृणमूल काँग्रेसचा खर्च त्याच्या कमाईपेक्षा ७८.१० टक्के अधिक होता.

अहवालात असे म्हटले आहे की भाजपच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत ऐच्छिक योगदान होता, तर काँग्रेसने कूपन जारी करून आणि बसपाला बँकेच्या व्याजातून बहुतेक उत्पन्न मिळाले.

निवडणूक आणि प्रचारासाठी भाजपचा सर्वाधिक खर्च ४२१.०१ कोटी रुपये होता, त्यानंतर १४५.६८ कोटी रुपयांचा प्रशासकीय खर्च झाला. काँग्रेसने निवडणुकीवर ९१.३५ कोटी रुपये आणि त्यानंतर संघटनेच्या कामावर ८८.४३ कोटी रुपये खर्च केले.

तृणमूल काँग्रेसने सर्वाधिक ९०.४१ कोटी रुपये निवडणूक खर्च केले, त्यानंतर ३.९६ कोटी रुपये प्रशासकीय आणि इतर कामांवर खर्च केले. राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण खर्चापैकी ८४ टक्के खर्च प्रशासन आणि सामान्य खर्चावर केला.

भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने निवडणूक रोख्यांमधून अनुक्रमे २२.३८ कोटी रुपये, ४२ कोटी रुपये आणि १०.०७ कोटी रुपये उत्पन्न घोषित केले.

एडीआर अहवालात असे आढळून आले की सर्व पक्षांनी ५९ दिवस (बसप) ते २०१ दिवसांच्या (भाजप) दरम्यान निर्धारित मुदतीनंतर त्यांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0