राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. ७२ तासाच्य
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशारा नोटीशीत देण्यात आला आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असून, नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे.
गेले अनेक दिवस किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि नेत्यांवर आरोप करीत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब आणि इतर अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेत काढणार असल्याचे ते सातत्याने संगत आहेत.
परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचे बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल अनिल परब यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले होते.
१९ जून २०१९ रोजी पुण्यातील विवान साठे यांच्याकडून अनिल परब यांनी दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली. १ कोटींमध्ये ही जागा घेतली. शेतजमीन खरेदीखत आहे. जमिनीची सगळी कागदपत्रे शेतजमीन म्हणून आहे. पण अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहून ही जमीन अकृषिक असल्याचा दाखला जोडल्याचे म्हंटले होते, मात्र तो दाखला दाखवलेला नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
“७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण केले. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठयाकडे भरला”, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.
या आरोपांचे सगळे ट्विट मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी, अन्यथा १०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस परब यांनी सोमय्या यांना पाठवली आहे.
COMMENTS