नाझी जर्मनीत हेच व्हायचे – नसीरुद्दीन शाह

नाझी जर्मनीत हेच व्हायचे – नसीरुद्दीन शाह

“भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे”, असे वक्तव्य करीत अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी थेट सरकारवर टीका केली आहे. सरकारकडून अनेक फिल

९ जुलैला (उद्या) राज्यात रिक्षांचा संप
‘भाजपच खरी ‘टुकडे-टुकडे गँग’
जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ

“भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे”, असे वक्तव्य करीत अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी थेट सरकारवर टीका केली आहे. सरकारकडून अनेक फिल्म मेकर्सना असे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे शहा म्हणाले.

“भारतीय फिल्म इंडस्ट्री ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरदेखील निशाणा साधला आहे. सरकारकडून अनेक फिल्म मेकर्सना असे सिनेमा बनवण्यासाठी प्रोस्ताहन दिल जातं असल्याचं ते म्हणाले आहेत.

नसीरुद्दीन शहा यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला. शहा म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचे समर्थन करणारे सिनेमे तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारच्या कामगिरीचे कौतुक करणारे सिनेमे बनवले जातात. त्यांना निधी देखील दिल जातो. जर ते थेट प्रचार करणारे सिनेमे असतील, तर त्यांना क्लीन चीट देण्याचे आश्वासनही सरकारकडून दिले जाते.”

शहा पुढे म्हणाले, “नाझी जर्मनीमध्ये असेच झाले होते. चांगले चित्रपट तयार करणाऱ्या फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमे बनवण्यासाठी सांगितले जायचे. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नाहे, मात्र सध्या ज्या प्रकारचे मोठे सिनेमे येत आहेत, ते पाहता आपण अंदाज करू शकतो.”

नसीरुद्दीन शहा म्हणाले, की तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला आहेत. त्यांना आव्हान देऊ शकत नाही आणि आजही  ते रिझल्ट देत आहेत. या क्षेत्रात मी कधीही भेदभावाचा सामना केला नाही. मला तर करिअरच्या सुरुवातीलाच नाव बदलण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र मी माझं नाव बदललं नाही.” असं नसीरुद्दीन शहा म्हणाले.

“सलमान, शाहरुख,आमिर, यांना त्यांनी एखादे वक्तव्य केल्यानंतर होणाऱ्या टीकेची चिंता असते. कारण गमावण्यासाठी त्यांच्याकडे खूप काही आहे. त्यांचे केवळ आर्थिकच नुकसान होणार नाही, तर त्यांना सर्वच बाजुंनी त्रास दिला जाईल. हे फक्त जावेद साहेब किंवा माझ्यापर्यंच सीमित नाही, तर जो कुणी उजव्या विचारसरणीच्या विरोधात बोलेल त्याची अशीच अवस्था होईल,” असे शाह म्हणाले.

तालिबान विषयीच्या वक्तव्यावर शहा म्हणाले, की तालिबानचा इतिहास खूप वाईट आहे. ज्या लोकांनी जाहीरपणे तालिबानला समर्थन करणारे स्टेटमेंट दिले, त्या लोकांविषयी मी बोलत होतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: