कपिल सिब्बल यांना खासदारकीसाठी सपाकडून पाठिंबा

कपिल सिब्बल यांना खासदारकीसाठी सपाकडून पाठिंबा

लखनऊः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी समाजवादी पक्षाचे समर्थन घेत अपक्ष म्हणून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला. सिब्ब

हार्दिक पटेलः गुजरात काँग्रेसचा नवा आक्रमक चेहरा
प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाला नकार
‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’

लखनऊः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी समाजवादी पक्षाचे समर्थन घेत अपक्ष म्हणून राज्यसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला. सिब्बल यांनी आपण काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा १६ मे रोजी दिला होता, असेही प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले.

राज्यसभेचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव व अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

अर्ज भरल्यानंतर सिब्बल यांनी आपण अपक्ष म्हणून सपाचा पाठिंबा घेत अर्ज भरला होता, या पक्षाचे आपण आभार मानत असून गेल्या वेळी आपण उ. प्रदेशमधूनच खासदार होतो. या राज्याच्या समस्या त्यावेळीही सदनात मांडत आलो होतो, आताही ते कार्य सुरू राहील. पुढील सहा वर्षे आपण हे काम करत राहू. काँग्रेसचे आता आपण नेते नाही, १६ मे रोजीच राजीनामा दिला होता, असे सांगितले.

सिब्बल यांनी काँग्रेस विषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. आपण पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसबाबत काही बोलणे योग्य वाटत नाहीत, ३०-३१ वर्षांचे नाते तोडणे सोपे नसते असेही सिब्बल म्हणाले.

काही दिवसांपूर्वी २७ महिने सीतापूर तुरुंगात असलेले सपाचे ज्येष्ठ नेते आजम खान यांना एका प्रकरणात जामीन देण्यात सिब्बल यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

उ. प्रदेशातून ११ जागा राज्यसभेसाठी असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. या ११ जागांसाठीचे मतदान येत्या १० जून रोजी होणार आहे. ४०३ सदस्य संख्या असलेल्या उ. प्रदेश विधानसभेत सपाचे १११ आमदार असून ते ३ उमेदवारांना राज्यसभेत निवडून आणू शकतात. सपाने आपल्या अन्य दोन उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0