महाराष्ट्राला अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात ५ सुवर्णपदके

महाराष्ट्राला अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात ५ सुवर्णपदके

पंचकुला: खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने गुरुवारी पदके मिळवली. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळवले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य प

काश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत
२० तब्लीगी परदेशी नागरिकांची निर्दोष सुटका
मेहबूबा, ओमर नजरकैदेत

पंचकुला: खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने गुरुवारी पदके मिळवली. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळवले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके मिळवली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.

जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले.

वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक पटकावले.

२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने गुरुवारीही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले.

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले.

महाराष्ट्राच्या पदकतालिकेत गुरुवारी एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली.

पदकतालिका

हरियाणा  – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)

महाराष्ट्र – ३० सुवर्ण,  २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)

मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0