मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात

मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात

वाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात ओएलएक्स या वेबसाइटवर केल्याप्रकरणात ४ जणांना शुक्रवा

पालघर घटनेला सोशल मीडियाने कसा जातीय रंग दिला?
१०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान
अमेरिका तालिबान शांतता करार – भोंगळ पळवाट

वाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात ओएलएक्स या वेबसाइटवर केल्याप्रकरणात ४ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

या चार जणांनी मोदींचे वाराणसीतील ‘जनसंपर्क कार्यालयाचे’ फोटो काढले आणि हे कार्यालय विकणे आहे अशी जाहिरात ऑनलाइन खरेदी-विक्री साइट ओएलएक्सवर प्रसिद्ध केली. हे कार्यालय शहरातल्या जवाहर नगर भागात असून भेलूपूर पोलिस हद्दीत ते येते.

गुरुवारी पंतप्रधानांचे वाराणसीतील जनसंपर्क कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एकाएकी खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच या प्रकाराची गंभीर दखल घेत चौघांना ताब्यात घेतले.

वाराणसी या लोकसभा मतदारसंघातून मोदी दोन वेळा निवडून आले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0