नवी दिल्ली : मुद्रा कर्ज व कांद्याच्या दरावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जे काही वक्तव्य केलं त्याने देशभर प्रतिक्रिया उमटल्या
नवी दिल्ली : मुद्रा कर्ज व कांद्याच्या दरावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत जे काही वक्तव्य केलं त्याने देशभर प्रतिक्रिया उमटल्या. माध्यमांनी या घटनेबाबत चर्चा घडवून आणल्या.
बुधवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या किॅमती का वाढत आहे , कांद्याचे उत्पादन का घटले, असा सवाल करत कांदा उत्पादक हा छोटा शेतकरी असून कांद्याच्या पिकाला किमान आधारभूत दर सरकारकडून मिळेल का, कांद्याच्या किॅमतींनी शतक पार केल्याने ग्राहक चिंतेत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आपण इजिप्तच्या कांद्यावर समाधानी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जेव्हा सीतारामन या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उठल्या तेव्हा सभागृहात एका सदस्याने आपण कांदा खाता का असा सवाल केला. त्यावर त्या म्हणाल्या, मी कांदा, लसूण खात नाही. ज्या कुटुंबातून मी आले आहे त्या कुटुंबात कांदा बाबत फारशी फिकीर केली जात नाही असे वक्तव्य केले.
सीतारामन यांचे हे वक्तव्य निश्चितच त्या ब्राह्मण कुटुंबातून आल्याचे ध्वनित करणारे होते . पण आज काल ब्राह्मण मोठ्याप्रमाणात मटणासोबत कांदा लसूण खाणारे दिसतात.
त्यात संसदेच्या बाहेर भाजपचे एक राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी सीतारामन यांच्या विधानाला पुष्टी देत आणखी एक वाद निर्माण होईल असे विधान केले. ते म्हणाले, मी शाकाहारी आहे व कांदा खात नाही. त्याची आजवर चवही पाहिलेली नाही. त्यामुळे माझ्या सारख्या व्यक्तीला कांद्याच्या बाजारपेठेची माहिती कशी असेल?
काॅंग्रेसची टीका
सीतारामन या नेहमीच काॅंग्रेसच्या टीकेच्या विषय बनल्या आहेत. त्यांच्या कांद्यावरील विधानावर काॅंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी लगेच निशाणा साधला. पी. चिदंबरम जामीनावर सुटल्याने त्यांनी गुरुवारीच केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. सरकारला अर्थववस्थेचे दुखणेच लक्षात येत नाही असे ते म्हणाले. त्यांनी सीतारामन या भारताच्या मेरी आंत्वानेत असल्याचा थेट आरोप केला. त्या कांदा खात नाहीत मग त्या अवॅकाॅडो खातात का असा थेट प्रश्न त्यांनी विचारला . केक खाऊ देत असेही ते म्हणाले.
COMMENTS