जयपूर : राजस्थानातील चुरू येथील सरदारशहर पोलिस ठाण्यात नऊ पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप एका ३५ वर्षी दलित महिलेने केला आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये
जयपूर : राजस्थानातील चुरू येथील सरदारशहर पोलिस ठाण्यात नऊ पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप एका ३५ वर्षी दलित महिलेने केला आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये पोलिस ठाण्याचा प्रमुख असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एक पत्र पाठवले असून आपली फिर्याद नोंद करून घ्यावी अशी मागणी तिने केली आहे.
द वायरने या महिलेच्या पतीशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘सहा महिन्यापूर्वी झालेल्या एका चोरी प्रकरणात मला पोलिसांनी पकडले होते. पण माझ्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला होता. पण नंतर ३० जूनला पोलिस आमच्या घरी आले आणि मला त्यांनी पकडून नेले. नंतर ३ जुलैला पुन्हा पोलिस आमच्या घरी आले आणि त्यांनी माझी पत्नी व भावाला जबरदस्तीने पोलिस ठाण्यात पकडून नेले. तेथे दिराला जबर मारहाण करण्यात आली. त्यात ६ जुलैला त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुरावे लपवण्यासाठी ७ जुलैला माझ्या भावाचा मृतदेह जाळून टाकला. नंतर माझ्या पत्नीवर पोलिस ठाण्यात बलात्कार करण्यात आला.’
या महिलेने आठ पोलिसांचे नावे घेतली असून ती अशी आहेत. राम प्रताप गोधरा, हेमराज, विरेंद्र कुमार, कैलाश जंकेश, कृष्णा, महेश व सचिन. या पोलिसांनी जबरदस्तीने आपली नखे काढली, डोळ्याला दुखापत केली व नंतर बलात्कार केल्याचे या महिलेने सांगितले. पोलिस ठाण्याचा प्रमुख रणवीर सिंग याचेही नाव या महिलेले तक्रारीत घेतले आहे.
११ जुलैला या महिलेला जयपूर येथील सवाई मान सिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या शनिवारी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना निलंबित केले आहे. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राजस्थान विधानसभेत सोमवारी दिसून आले. काँग्रेसचे सदरशहर येथील आमदार भावरलाल शर्मा यांनी या महिलेची तक्रार खोटी असल्याचा दावा केला. गावातील एका गुंडाने या कुटुंबाला तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप शर्मा यांनी केला. या महिलेच्या दिराला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हाच तो गावकऱ्यांच्या मारहाणीत जबर जखमी झाला होता. असे शर्मा यांनी सांगितले.
राज्याचे कायदा मंत्री शांती धारीवाल यांनी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू झाल्याचे सभागृहाला सांगितले. या महिलेने आपला जबाब पोलिस महानिरीक्षकांना १३ जुलै रोजी दिला आहे व त्या आधारावर १४ जुलैला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण एका महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सोपवले असून फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्याचे धारीवाल यांनी सांगितले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते गुलाब चंद कटारिया यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली असून हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मूळ बातमी
COMMENTS