सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार

सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनुवादीत केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

बिहारमध्ये सीबीआयचे तपास संशयास्पदच!
कुटुंब व समाजामधील स्त्री-पुरुषाच्या भूमिकेकडे भारतीय कसे पाहतात?
अग्निपथ भरतीत सहकार्य नसल्याने लष्कर पंजाबवर नाराज

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनुवादीत केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रँचसह अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तर, मंजुषा कुलकर्णी यांना ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. रोख ५० हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सोनाली नवांगुळ, या मूळच्या बत्तीस शिराळा येथील आहेत. वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर २००० साली त्यांनी कोल्हापूरमध्ये हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. २००७ साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या.

सोनाली नवांगुळ या भारतातल्या ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात. तसेच मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद’ हे पुस्तक ‘मेनका प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणार्‍या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर’ या नावाने ‘मनोविकास’ प्रकाशनने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता ‘मनोविकास’ प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे.

नाली नवांगुळ यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील चार पुस्तके अनुवादित आहेत. ‘स्वच्छंद’ हे ललितलेखावर आधारित पुस्तक आहे. ‘जॉयस्टिका’हा मुलांच्या गोष्टींचा संग्रह. ‘मेध पाटकर- नर्मदा बचाव आंदोलनाचा बुलंद आवाज’ तसेच अरुण गांधी यांच्या पुस्तकाचे ‘वरदान रागाचे’ आणि ‘वारसा प्रेमाचा’ या पुस्तकाचे अनुवादही त्यांनी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0