सुधा भारद्वाजांचा जामीन कायम

सुधा भारद्वाजांचा जामीन कायम

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या व वकील सुधा भारद्वाज यांना मिळालेल्या जामिनावर हरकत घेणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याच

जत्रेतल्या आरशातले प्रकाशराव
गौतम नवलखा यांचा जामीन फेटाळला
हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते!

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या व वकील सुधा भारद्वाज यांना मिळालेल्या जामिनावर हरकत घेणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्या. लळीत, न्या. भट व न्या. त्रिवेदी यांच्या पीठाने एनआयएला सांगितले.

१ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज यांचा जामीन मंजूर केला होता. भारद्वाज यांच्यावर एल्गार परिषद प्रकरणात ऑगस्ट २०१८मध्ये अटक करून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. पण एनआयएने त्यांच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही, शिवाय ९० दिवसांची त्यांना स्थानबद्ध करण्याची तारीख २५ जानेवारी २०१९मध्ये संपली होती तरीही त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते, यावर न्यायालयाने आक्षेप घेत सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0