‘स्वच्छ’ला साफ करण्याचा डाव

‘स्वच्छ’ला साफ करण्याचा डाव

घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे संकलन करण्याची पद्धत सुरू करणाऱ्या कचरा वेचकांच्या ‘स्वच्छ’ या संस्थेकडून हे काम काढून ठेकेदार घुसवण्याचा प्रयत्न सर्व पक्षीय नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू केला असून, त्यासाठी नुकताच स्थायी समितीमध्ये ठराव करण्यात आला.

‘शाहीन बाग’ला भाजपकडून कट्‌टर हिंदुत्वाचे प्रत्युत्तर
स्वतंत्र मणिपूरची घोषणा करणाऱ्याला एनआयएकडून अटक
कोरोनाने दुभंगलेला इटली

घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे संकलन करण्याची पद्धत सुरू करणाऱ्या कचरा वेचकांच्या ‘स्वच्छ’ या संस्थेकडून हे काम काढून ठेकेदार घुसवण्याचा प्रयत्न सर्व पक्षीय नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू केला असून, त्यासाठी नुकताच स्थायी समितीमध्ये ठराव करण्यात आला.

१२ जानेवारीला ‘स्वच्छ सहकारी सेवा संस्थे’कडून केले जात असलेले कचरा संकलनाचे काम काढून घेण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. कचरा वर्गीकरण आणि संकलनासाठी निविदा प्रक्रिया सुरू करून खासगी ठेकेदाराला हे काम दिले जाणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ‘स्वच्छ’ संस्थेने कचरा संकलनाचे काम पुढे दीड महिना करावे, असाही निर्णय घेण्यात आला.

कचरा व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना आदेश दिल्यानंतर पुण्यातील ‘कागद काच पत्रा संघटनेने शहरातील सर्व कचरा वेचकांना एकत्र आणून ‘स्वच्छ सहकारी सेवा संस्थे’ची स्थापना केली. या संस्थेद्वारे सर्व कचरा वेचक घरोघर जाऊन जाऊन वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे संकलन करतात. यासाठी संस्थेबरोबर पुणे महानगरपालिकेने करार केला आहे. पाच वर्षांसाठी असलेला हा करार ३१ डिसेंबर २०२० मध्ये संपला.

या काराराद्वारे संस्थेला शहरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो संकलित करण्यासाठी नागरिकांकडून ठरावीक शुल्क वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पुण्यातील साडेआठ लाख मिळकतींमधून दर महिन्याला ‘स्वच्छ’च्या कचरा वेचकांना दर महिन्याला पैसे मिळतात. तसेच स्वच्छ संस्थेला पर्यवेक्षण शुल्क म्हणून महापालिकेकडून दरवर्षी पावणे चार कोटी रुपये दिले जातात.

‘स्वच्छ’ या संस्थेने अनेक कचरा वेचकांना हक्काचा रोजगार मिळवून दिला. २००७ मध्ये स्थापन झालेल्या ‘स्वच्छ’बरोबर सध्या ३५०० हून अधिक कचरा वेचक काम करतात. शहरातील २ हजार टन कचऱ्यापैकी ‘स्वच्छ’द्वारे दररोज १२ शे १५ टन कचरा दररोज गोळा करण्यात येतो आणि त्यातील २२० टन कचरा दररोज रिसायकल करण्यात येतो.

कचरा गोळा करण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि कचरा वेचकांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली.

कचरा वेचक हेच संस्थेचे पदाधिकारी आहेत. सुमन मोरे या ‘स्वच्छ’च्या अध्यक्षा आहेत. त्या मुकुंद नगर भागामध्ये कचरा वेचक म्हणून काम करत होत्या. हौसा ससाणे या ‘स्वच्छ’च्या समितीवर सदस्या आहेत. त्या विमान नगर भागामध्ये कचरा वेचक म्हणून काम करतात.

अनेक कचरा वेचकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराच्या संदर्भात प्रतिनिधीतत्व करण्याची संधीही ‘स्वच्छ’ने दिली. सुमन मोरे यांनी जिनिव्हामध्ये आणि नेपाळमध्ये पुणे शहराचे दोनदा प्रतिनिधीत्व केले. तर हौसा ससाणे यांनी जर्मनी येथे पुण्याचे प्रतिनिधीत्व केले.

शहरामध्ये कचरा संकलनाचे जाळे तयार केले. नागरिकांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जागरूकता निर्माण केली. आपला कचरा ही आपली जबाबदारी असल्याची भावना नागरिकांमध्ये तयार करण्यास मदत केली.

महापालिका प्रशासनाने ‘स्वच्छ’ला ३ महीने मुदतवंद देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये ठेवला होता. मात्र कचरा संकलनाचे काम करताना स्वच्छ संस्थेकडून नियमांचा भंग होत आहे, असे आरोप करत नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्यास विरोध केला होता.

स्थायी समितीच्या १२ जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये प्राशसनाच्या प्रस्तावावर चर्चा झाली. स्वच्छ संस्थेबरोबरचा करार संपुष्टात आल्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वच्छ संस्थेने कचरा संकलन करावे, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

स्वच्छ संस्थेबरोबर करार करण्यात येऊ नये, अशी भूमिका अनेकवेळा नगरसेवकांनी मांडली होती. ‘स्वच्छ’चे काम काढून घेण्याचा घाट यापूर्वीही काही नगरसेवकांनी घातला होता.

यापुढे निविदा काढली जाणार आहे. कचरासेवक तेच राहणार असून कचरा संकलनाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. ही प्रक्रिया दीड महिन्यात पूर्ण करण्याची स्थायी समितीची सूचना आहे. स्वच्छ संस्थाही निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0