ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

ऑगस्टमध्ये उत्तराखंडात चीनची घुसखोरी

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) १००हून अधिक जवानांनी उत्तराखंडमधील बाराहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची मा

‘वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती’ : ७ शहीद जवानांच्या कथा
मकाऊ – आशियातील कुबेर नगरी
आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) १००हून अधिक जवानांनी उत्तराखंडमधील बाराहोती सेक्टरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. ३० ऑगस्टला काही तासांकरिता चीनचे १००हून अधिक सैनिक बाराहोती सेक्टरमध्ये घुसले होते. ते तेथे काही तास थांबले. भारत-तिबेट सीमा पोलिसांनी या सैनिकांच्या घुसखोरीला आक्षेप घेतल्यानंतर हे सैनिक माघारी गेल्याचे पीटीआयचे वृत्त आहे. ही घुसखोरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून होती व ती सुमारे ५ किमी पर्यंत आत होती, असे पीटीआयचे म्हणणे आहे.

या घुसखोरीबाबत चीनने आपली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. घुसखोर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत कोणतेही नुकसान केलेले नाही, असेही समजते.

गेल्या वर्षी लडाखमधील गलवान खोर्यात चीन व भारताच्या सैनिकांमधील चकमकीचा मुद्दा अजूनही चर्चेत असताना बाराहोतीमधील घुसखोरीची घटना उघडकीस आली आहे.

बाराहोती सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीन व भारतदरम्यान मतभेद आहेत, त्यामुळे ही घुसखोरी झाल्याचे पीटीआयचे म्हणणे आहे. या घुसखोरीत चिनी सैनिकांची संख्या कमी कशी होती याचेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0