बलात्कार प्रकरणातील फक्त ३२.२ टक्के दोषी

बलात्कार प्रकरणातील फक्त ३२.२ टक्के दोषी

निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या गेल्या ७ वर्षांत बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्याची टक्केवारी केवळ ३२.२ टक्के असल्याची माहिती नॅशनल क्राइम

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचे एन्काउंटर
इतकं क्रौर्य नेमकं येतं कुठून?
बनावट एन्काउंटर : अराजकाचे राज्य

निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या गेल्या ७ वर्षांत बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्याची टक्केवारी केवळ ३२.२ टक्के असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)ने दिली आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणानंतर बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देणारा कायदा संसदेने केला होता पण या कायद्याची दहशत अद्याप बसली नसल्याचे या आकडेवारीनुसार दिसून येते.

२०१७मध्ये देशात बलात्काराचे १,४६,२०१ गुन्हे नोंदले गेले होते व त्यापैकी केवळ ५,८२२ आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. बलात्कारातील दोषींची संख्या महानगरात कमी असल्याचेही आढळून आले आहे.

गेल्या काही वर्षांत बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्याचे प्रमाण वाढलेले दिसले असले तरी आरोपपत्र दाखल करण्याची टक्केवारी कमी झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०१७मध्ये ८६.४ टक्के आरोपपत्र दाखल करण्यात आले होते हे प्रमाण २०१३मध्ये ९५.४ टक्के इतके होते.

२०१७मध्ये बलात्काराची १,४६,२०१ प्रकरणांची सुनावणी झाली होती. त्यापैकी १८,३३३ प्रकरणांचा निकाल लागला.

अलवार बलात्कार प्रकरणातील बचाव पक्षाच्या एक वकील शिल्पी जैन यांच्या मते, बलात्कार प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ते नसल्याने अशा घटनांचा योग्य तपास होत नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0